FRANCHISE OPPORTUNITY

आदर्श शैक्षणिक समूहातील,
श्री ऋषिकेश शिक्षक प्रसारक मंडळ न्यू पनवेल, नवी मुंबई संचलित,

Adarsh Teacher’s Training Institute

घेऊन येत आहे, आपल्या रौप्य मोहत्सवी वर्षात, पदवीधर महिलांसाठी रोजगाराची एक सुवर्णसंधी.

गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीरीत्या कार्यरत

मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर, ठाणे,पुणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये

गेल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून बालवाडी शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात अग्रेसर असताना

मिळालेल्या अपार यशानंतर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून घेऊन येत आहोत

एकाच वेळी नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), रत्नागिरी व पुणे या सहा जिल्ह्यांमध्ये नव्याने पदार्पण ...

नवीन शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर

(आंगणवाडी शिक्षिका व सेविका मेगा भरती च्या अनुषंगाने)
मोठ्या प्रमाणात नियुक्त केल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक शिक्षकांना बालवाडी शिक्षक प्रशिक्षण देण्यासाठी , वरील सहा जिल्ह्यांमध्ये नवीन केंद्रांची योजना कार्यान्वयित करण्यात आली असून त्याकरिता इच्छुक पदवीधर महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्वरा करा, इच्छुक असणाऱ्या पदवीधर महिला, युवती, गृहिणी, सेवानिवृत्त, शिक्षका यांना आपल्या फावल्या वेळात एका सामाजिक कार्यात सहभागी होऊन अर्थार्जन करण्याची एक सुवर्ण संधी

अर्ज करण्यासाठी कालावधी दिनांक ४ मार्च २०२३ ते २० मार्च २०२३

संपर्क करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा
प्राचार्या सौ. जाई जगताप
७८८७५६६५६१

Contact Form

TESTIMONIALS

सौ. प्रिया घेवडे मॅडम

सौ. प्रिया घेवडे मॅडम

सेंटर डायरेक्टर, नेरूळ-पूर्व

मी, सौ. प्रिया घेवडे, सेंटर डायरेक्टर, नेरूळ-पूर्व, आदर्श संस्थे मध्ये दिनांक १६ नोव्हेंबर, १९९७ रोजी रुजू होऊन थेट आजतागायत म्हणजे २०२३ मध्ये सुद्धा कार्यरत आहे. आज मला हे सांगायला अभिमान व आनंद सुद्धा वाटतो की मला आज मितीस ह्या संस्थेत २५ वर्षांचा काळ पूर्ण होत आहे.
ही एवढी २५ वर्षे मी कशी पूर्ण करू शकले हे माझे मला कळले देखील नाही.
कै. बापुसाहेब विसपुते यांनी निश्चित ध्येय निष्ठ विचारा अंती व निर्धार पूर्वक असे इवलेसे रोपटे सन १९९७ मध्ये नवी मुंबईत लावले. पण आज ह्या रोपट्या चे मोठ्या व भव्य अशा वटवृक्षात रूपांतर झाले, मा.विसपुते सर व त्यांच्या सोबत
सौ. विसपुते मॅडम सुद्धा नेहमी प्रमाणेच खांद्या ला खांदा लावून हे शिवधनुष्य उचलायला पूर्ण शक्ती व सामर्थ्या ने सज्ज झाल्या. याचे एकमात्र श्रेय ह्या दाम्पत्यास जाते, कारण एकच, ह्या विषयावर, आपल्या कामावर निस्सीम श्रद्धा व जिद्द आणि जोडीस चिकाटी चे पूर्ण प्रयत्न. आणि अशा संस्थेत जबाबदारी ने कार्य करण्या साठी ‘मी’ ही तेवढ्याच तत्परतेने व आनंदाने प्रेरित होऊन रुजू झाले. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी इथे हसत-खेळत व मोठ्या आनंदातच राहिले. येथे कार्यरत असताना मला खुप असे शिकायला सुद्धा मिळण्याची वेळोवेळी संधी मिळत राहिली, आणि ह्या प्रत्येक संधीचे मी ‘सोने’ केले.
ह्या संस्थेत केवळ ‘बालवाडी’ चा कोर्स केला नाही, तर ईसीसीडी, सीटीसी, पीटीसी सारखे इतर सरकार मान्य आणि भविष्यात देखील उपयुक्त असे कोर्सेस सुरू केले, माझ्याकडे कित्येक वर्षे सरासरी एकेका बॅच मध्ये साधारण पणे ५० ते ६० विद्यार्थ्यां चे प्रवेश होत असंत.
अलिकडच्या २०२० च्या “कोरोना” संकटाने तर कहर च केला होता. असे वाटले होते की आता मात्र आपले हे कार्य स्थगित किंवा ठप्पच होईल, पण नियती ने त्या वेळेस आम्हास एक विलक्षण असा सांकेतिक कानमंत्र दिला आणि काय हे आश्चर्य की “डिजिटल” माध्यमातून म्हणजे “झूम” मिटिंग्सच्या प्रयोगा ने प्रेरित होऊन तर एक नविन आणि आधुनिक क्रांती पर्वच सुरू झाल्याचा जणू दाखला दिला आणि अहो आश्चर्यम्, ही पवित्र कार्या ची धुरा अशीच भविष्यात देखील चालु राहिली पाहिजे असे प्रयोग सिद्ध झाले. अशा कठीण काळात सुद्धा संस्थेने आम्हास प्रेरित करून नेहमी प्रमाणेच एक नवी उर्जा व दिशाच दिली. खरोखरीच स्तुत्य आणि वेगळेच अभिनव असे पाऊल ठरावे असेच झाले. अशा काही वेळीस यथोचित व समर्पक उत्तर मिळाल्यास का बरे आदर वाटू नये ही न बोललेली प्रतिक्रिया सहजच उमटून जायची. ह्या मध्ये जरूर पडल्यास दोन-दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर देखील ताबडतोब आयोजित करणे ही सुद्धा आता नित्याचीच बाब म्हणून जमा होत आहे. अशी दोन-दोन दिवसीय शिबीरे पण आम्हास माहेर वाशिणी सारखेच वाटायचे. अजून ही ह्या संस्थेत कार्यरत असल्याचा उत्साह दिवसागणिक वाढतच चालला आहे.

रश्मी राजेंद्र पाथरकर

रश्मी राजेंद्र पाथरकर

केंद्र संचालिका, विरार पूर्व. श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ ,नवी मुंबई.

मी जून 2003 पासून आदर्श शिक्षक प्रशिक्षण केंद्रामार्फत , माझे केंद्र चालवत आहे. सुरुवातीला माझ्या केंद्रातून बालवाडी प्रशिक्षण कोर्स हा मराठी ,हिंदी ,गुजराथी , उर्दू ,इंग्लिश या माध्यमातून व हस्तकला प्रशिक्षण कोर्स हा मराठी व इंग्रजी या माध्ममाद्वारे घेण्यात आले .त्यानंतर साधारण 1 वर्षांनी माझ्या केंद्रातून ECCED व CTC हे दोन नवीन कोर्स मराठी व इंग्रजी माध्यमातून आपल्या संस्थेने सुरू केले व माझ्या केंद्रातून या कोर्स चे प्रशिक्षण चालू झाले .ह्या सर्व कोर्स चे ट्रेनिग आधी आम्हां सर्व केंद्र संचालिका ना देण्यात आले. या करिता संस्थेने आमचे ट्रेनिंग शिबिर आयोजित केले व सर्व अभ्यासक्रम समजावून दिला . या कोर्स मध्ये 18 ते 60 वर्ष वयोगटातील मुली , गृहिणी, नोकरी करणाऱ्या महिला या आपले घर, ऑफिस, कॉलेज करून या कोर्स ला येतात.
या सर्व महिलांना या कोर्स च्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले . त्यांना त्यांच्या अभ्यासक्रम शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक शिबिर , विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या व्याख्यानमार्फत नवीन नवीन विषयावर मार्गदर्शन करून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर आमच्या संस्थेचे विशेष लक्ष असते. त्यामुळे आमच्या केंद्रातून विध्यर्थी जेव्हा प्रशिक्षण घेवून बाहेर जातात , त्यावेळी प्रशस्तीपत्रक सोबत, सर्वांगीण विकास घडलेली एक आदर्श शिक्षिका बाहेर जात असत . त्यामुळे आमच्या विद्यार्थीनीना कोणत्याही शाळेत सहज नोकरी मिळत असत .
विरार मधील जवळजवळ सर्वच शाळेत माझ्या विद्यार्थी नोकरी करत आहे. माझ्या केंद्रात बोरिवली पासून ते डहाणू पर्यंतचे आत्तापर्यंत 300 च्या वर विद्यार्थी प्रशिक्षण घेवून गेले आहेत . व याच भागातील शाळेत नोकरी करून आपले घर चालवत आहे. व आपले आदर्श चे नाव सार्थक करत आहे .
आमची संस्था ही खूप आम्हां केंद्र संचालिका व विद्यार्थीनींन चा जास्तीत जास्त विकास कसा होईल व त्यातून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळून त्यांचा त्यांच्या संसाराला हातभार कसा लाभेल यावर विशेष लक्ष देत असते . या करिता आमचे चेअरमन श्री धनराज विसपुते सर , सौ संगीता विसपुते मॅडम , प्राचार्या , सौ. जाई जगताप मॅडम सर्व ऑफिस कर्मचारी आम्हां केंद्र संचालिका व विद्यार्थी करिता सर्वतोपरी मदत करत असतात . मला या संस्थेने खूप काही दिले .एक आपलेपणा व एक हक्काचे माहेर मला दिले याकरिता मी सर्वांची खूप आभारी आहे. मला अभिमान आहे मी यासंस्थेचा एक भाग आहे .व हा आदर्श चा एक आदर्श परिवार आहे . या आदर्श परिवाराला माझा मानाचा मुजरा व त्रिवार सलाम.

सौ. अनुराधा काठे

सौ. अनुराधा काठे

नमस्कार, श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ,पनवेल या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी सर्वप्रथम मनःपूर्वक ,आभाळभर शुभेच्छा देते संस्थेसोबतच्या 25 वर्षां पूर्वीपासूनच्या या प्रवासाचे सिंहावलोकन करताना माझ्या कडे खूप सार्‍या आठवणींचा साठा आहे. 1997 ला उरण तालुक्यातील सर्वात प्रथम माँटेसरी हा अभ्यासक्रम चालवण्यासाठी संस्थेने माझी निवड केली आणि मला परवानगी दिली या कामाची सुरुवात 15 विद्यार्थ्यांपासून झाली. आज पावे तो आता ही संख्या हळूहळू वाढत अगदी 500 च्या वर गेली आहे या यशाच्या मागचे एकमेव कारण जे संस्थेचे चेअरमन श्री धनराज विसपूते यांचे लाभलेले बहुमोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य होय.
अविरतपणे यशस्वीरित्या सरांच्या या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले आणि उत्तम परिणामांनी या कार्याची परिणीती आज विद्यार्थिनींमध्ये दिसत आहे याचेही श्रेय या संस्थेचेच म्हणावे लागेल. संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्यामध्ये जो ज्ञानसेवेचा सेतू संस्थेने बांधायला घेतला आहे त्यात मी समजते की माझा हा खारीचा वाटा !!!!!! आणि हे कार्य अविरतपणे संस्था यशस्वीपणे करत राहील अशी मी आशा व्यक्त करते .
सौ. अनिता अरविंद जाधव

सौ. अनिता अरविंद जाधव

केंद्र संचालिका, खारघर, नवी मुंबई

आज आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल मी थोडक्यात मनोगत व्यक्त करत आहे. श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ नवी मुंबई आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेत केंद्र संचालिका खारघर नवी मुंबई म्हणून 2006 मध्ये कार्यरत झाले सतरा वर्षाच्या कालावधीच्या लेखाजोखा मांडायचा झाला तर या संस्थेने एक वेगळी ओळख दिली आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यावर दरवर्षी , संस्थेतर्फे केंद्र संचालिकांसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करून आम्हा सर्वांना शहाणं करून सोडलं आणि शिकवता शिकवता आम्हीही बरेच काही शिकूनही गेलो. आपण कुठे कमी पडतो, काय व कसे प्रगतीशील बदल करायला हवेत हे प्रत्येक शैक्षणिक वर्ष पूर्ण करताना लक्षात आलेले आहे. तसेच आमच्या केंद्रामध्ये प्रवेश घेतल्यानंतर व एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या शिक्षिका होऊन बाहेर पडतात तेंव्हा आमच्या खारघर स्थित शाळेत वेळोवेळी असलेल्या रिक्वायरमेंटला त्या नेहमीच सिलेक्ट झालेल्या आहेत. आत्तापर्यंत एकही विद्यार्थिनी रिजेक्ट झालेली नाही, याला कारण अभ्यासक्रमच एवढा परिपूर्ण आहे की आमच्या सारख्या शिक्षकांनी विद्यार्थिनींमधून परिपूर्ण टीचर घडवल्या. आज खारघर मधील प्रत्येक शाळेत आदर्श टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या दोन-तीन विद्यार्थिनी टीचर म्हणून कार्यरत आहेत. रामशेठ इंटरनॅशनल स्कूल खारघर या शाळेत आज घडीला प्रायमरी विभागात सात शिक्षिका कार्यरत आहेत. तसेच श्री समर्थ इंग्लिश स्कूल खारघर या शाळेत तर एक प्रिन्सिपल, व पाच टीचर्स असे एकूण सहा शिक्षक कार्यरत आहेत. ज्या टीचर्सना सात ते आठ वर्षाचा शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे अशा आपल्या काही टीचर यांनी आपली स्वतःची प्री स्कूल स्थापन केली आणि त्या प्री स्कूलच्या ओपनिंगला मला आमंत्रित केलं जातं त्यांनी अभ्यासपूर्वक केलेली तयारी व अन्युअल डे चा कार्यक्रम नियोजित पणे पार पाडणे, पालकांच्या चेहऱ्यावरील आपल्या मुलांच्या विकासासंबंधी असलेले समाधान इत्यादी बघितले की आनंद वाटतो. आदर्श संस्थेचे प्रतिबिंब खरोखरच आदर्श आहे. तेव्हा एक प्रशिक्षक म्हणून मला अनुभवायला मिळतात त्या गोष्टीचा खूप अभिमान आणि समाधान वाटते. मी केलेल्या चांगल्या कामांची नोंद घेऊन, माझी कमिटी सदस्य म्हणून निवड केली आणि त्या निवडीप्रमाणे मी त्यांना योगदान दिले.
या सर्व गोष्टींची दखल घेऊन भाजप खारघर तळोजा मंडळात फादर बॉडीत सेक्रेटरी म्हणून पद , डिसेंबर 2018 मध्ये मिळाले या पदाला न्याय देत जनसेवेची कामे करत आहे. आदर्श शैक्षणिक संस्थेतील कामामुळे राजकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली याच बरोबरीने अर्थार्जनही होत होतं म्हणजेच शैक्षणिक , सामाजिक,राजकीय व क्षेत्रातली ओळख ही आदर्श शिक्षण संस्थेमुळे मला मिळाली सदर संस्था खरोखरच आदर्श आहे. चेअरमन , दादासाहेब श्री. धनराज विसपुते, यांनी वेळोवेळी आयोजित केलेल्या ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यक्रमांमुळे ज्ञानात भर पडत गेली म्हणून मी त्यांची शतशः ऋणी आहे आणि त्यांच्याबरोबर काम करताना आज समाजाचं काहीतरी देणं आम्ही फेडत आहोत याचा सार्थ आनंद व समाधान होत आहे. धन्यवाद.

Contact Nos

Principal

Nashik

Jalgaon

Ahemadnagar

Ratnagiri

Aurangabad

Contact Form