Journey of 25th yrs

२५ व्या वर्षात पदार्पण

आदर्श शैक्षणिक समूहाच्या,
श्री. ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ नवी मुंबई , या संस्थेचे आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी 25 व्या वर्षात पदार्पण होत आहे. कै. बापूसाहेब देविदास दामोदर विसपुते यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून त्याच्या छत्रछाये खाली आदर्श शैक्षणिक समूहाच्या इतर 50 शिक्षण संस्था आज दिमाखात उभ्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र असे बदल घडवून आणत , बालवाडी शिक्षक प्रशिक्षणा पासून सुरवात केलेला हा प्रवास आज संशोधन मार्गदर्शना पर्यंत पोचला आहे. संस्थेचे चेअरमन आणि भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे प्रदेश सह संयोजक, दादासाहेब श्री. धनराजजी विसपुते, सचिव, श्रीमती. संगिता विसपुते तसेच इतर विश्वस्त व प्राचार्य यांच्या प्रयत्नाने हि संस्था यशाची उत्तुंग शिखरे पार करत आहे. अशा या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 💐💐