आज 1 जुलै 2019 रोजी आदर्श शैक्षणिक समूहाच्या नजरेने टिपलेला एक अलौकिक सोहळा…. कु.धनश्री धनराज विसपुते यांच्या जन्मदिवसा निमित्ताने केले गेले वृक्षारोपण…
सामाजिक बांधिलकी व नैसर्गिक जबाबदारी याप्रती आदर्श शैक्षणिक समूह नेहमीच अग्रेसर असतो. साता समुद्रा पलिकडे असूनही, आपल्या भारतभूच्या संवर्धनासाठी सतत आग्रही असणारे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री . धनराजजी विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता विसपुते यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली कन्या कु.धनश्री धनराज विसपुते यांच्या जन्मदिवसा निमित्ताने आज आदर्शच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. विचुंबे ग्रामपंचायत सदस्य श्री.किशोर सुरते यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नंतर उपस्थित सर्व विभागीय प्राचार्यांनी वृक्षारोपण करून एका प्रकारे सर्वांना जणू एक कानमंत्र दिला,…