The Acceptance Webinar & Yoga Day 2020

“आदर्श शैक्षणिक समूह” संचलित, आदर्श शिक्षण प्रशिक्षण केंद्र आणि श्री डी. डी. विसपूते डी.एड. काॅलेज पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, “स्वीकृती The Acceptance ” हा COVID 19 V/S Yoga या विषयावर वेबिनार संपन्न झाला…. या प्रसंगी पुढील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्रमुख वक्ते
आद. श्री. सतिश देशमुख – सचिव, योगा केंद्र पनवेल.

मुख्य अतिथी
आद. डॉ. कलापिनी अगस्ती- दर्शनशास्त्र विभाग प्रमुख कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्र्वविद्यालय रामटेक.

आद. श्री. सुभाष महाजन- क्लास वन ऑफिसर DIET पनवेल

विशेष उपस्थिती
आद. श्री. धनराजाजी विसपूते – अध्यक्ष आदर्श शैक्षणिक समूह.
आद. श्रीम. संगीता विसपूते- सचिव आदर्श शैक्षणिक समूह

‘आदर्श शैक्षणिक समूह ‘कोणत्याही सकारात्मक गोष्टीमध्ये अग्रस्थानी असतो, आणि याचे सर्वात मोठे श्रेय जाते ते आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आद. दादासाहेब श्री धनराजजी विसपुते आणि सचिव श्रीमती संगिता विसपुते यांना…
संपूर्ण जगभर सुरू असलेल्या या संकटामुळे जगाला नैराश्याने ग्रासून टाकले आहे. या नैराश्याच्या भस्मासुराला अनेकजण बळी पडत आहेत, सर्वसामान्य जनता तर सोडाच परंतु यशाच्या शिखरावर पोहचलेल्या सुशांत सिंह राजपूत , हिमांशू राय , भैय्यु महाराज अशा अनेकांनी या नैराश्यातूनच आपले जीवन संपवलेले आपल्याला अवगत आहेच.
मित्रहो या नैराश्याचे कारण म्हणजे अति तणाव, शारीरिक आणि मानसिक ताण… पण यातून बाहेर पडवायचे असेल तर एकच तरणोपाय म्हणजे योगाभ्यास….
योग म्हणजे एक प्रज्वलित केलेली वात आहे,
जी एकदाच प्रज्वलित करावी लागते, एकदा प्रज्वलित केल्यावर ती कधीही विझत नाही.
जेवढा आपण त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करू तेवढाच जास्त प्रकाश आपल्याला मिळत जातो.
शरीर आणि मन स्वस्थ नसेल तर त्याचा जीवनावर एक भार बनत जातो. ज्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य नसेल त्यांच्या मेंदूला चालना आणि शरीराला स्फूर्ती मिळू शकत नाही. योग हा एक असा अभ्यास आहे. जो शारीरिक मानसिक विवंचना मिटवून समाधानाचे एक स्थैर्य मिळवून देतो आणि त्यातूनच सकारत्मक विचारसरणीचा जन्म होऊ लागतो.
आद. विसपुते सर आणि मॅडम यांनी या टाळेबंदीच्या काळात आपल्या शैक्षणिक समूहातील प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबाप्रमाणे सांभाळले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या या ५०हून अधिक शिक्षण संस्थांचे जाळे हे एका सकारत्मकतेच्या आणि विश्वासाच्या बळावर विणले गेले आहे. समूहातील कर्मचार्यांमधून, गेटच्या वाॅचमेन पासून ५० संस्थेच्या ५० विभाग प्रमुखांपर्यंत प्रत्येकाशी संपर्कात राहून त्यांना मनोधैर्य देण्याचे काम या उभयतांनी केले आहे. विविध उपक्रमातून शासन नियमांचे पालन करीत Digitally Connect राहून सर्वांना उत्साहीत ठेवणे व त्यांना सकारात्मक विचारसरणी देणे यासाठी संगीता मॅडम यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले आहेच, परंतु वर्षभरातील सर्व साजरे होणारे कार्यक्रम देखिल Digitally करण्याचे नियोजन केले गेले आहे. त्यातीलच एक पुष्प, म्हणजे हा जागतिक योगा दिना निमित्ताने आयोजित केलेल्या वेबिनार ची काही क्षणचित्रे आपणा समोर सादर करीत आहोत.

Adarsh Teachers Training Institute celebrates 25th Anniversary. Click here to know more

Admission is available online for Academic Year 2022-23Digitally easy to adopted online/Offline Teaching & Learning process will be available.

For More Details contact on 7887566561 / 7038524205
Enquiry for Course Details