न हरता , न थकता , न थांबता प्रयत्न करणार्यां समोर कधी कधी नशिब सुध्दा हरतं

” न हरता , न थकता , न थांबता प्रयत्न करणार्यां समोर कधी कधी नशिब सुध्दा हरतं “….
….पाणी वाहतं म्हणून त्याला मार्ग सापडतो , त्याच प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, समाधानाची वाट सापडतेच…
मागच्या ६ महिन्यांपासून कोरोना सारख्या जागतिक महामारीला संपूर्ण जग सामोरे जात आहे… आर्थिकदृष्ट्या, तंत्रज्ञानाने प्रगत अशा सुपर पाॅवर देशांना सुध्दा कोरोनामुळे नामोहरम व्हावे लागत आहे. भारतामध्ये गेल्या २ महिन्यांपासून कोरोना नामक भयनाट्य सुरू आहे….. त्याचा निर्माता कोण ? दोषी कोण? यापेक्षा, त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई कोणती यावर भारतामध्ये निर्णय घेण्यात आले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील तरतुदीनुसार ‘संघराज्य ‘ हा शब्द राज्यघटनेत वापरला आहे. ‘ Nation first ‘ ही तरतूद संघराज्य मजबूत करते व संविधानिक शक्तीमुळे , शासनाकडून लोकहितासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले गेले , हीच सगळ्यात जमेची बाजू आहे.
“अपयशाच्या भितीपेक्षा , यश मिळविण्याची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे “….. याचा प्रत्यय आपल्या देशातील शासन निर्णयातून येतो.
‘ हो ‘ आणि ‘ नाही ‘ हे दोन छोटेसे शब्द आहेत. परंतु त्यावर सखोल विचार केला तर लक्षात येते की, ‘ नाही ‘ लवकर म्हटल्यामुळे तर ‘ हो ‘ उशीरा म्हटल्यामुळे, जीवनात बर्याच गोष्टी गमवाव्या लागतात.
आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आद. श्री धनराज विसपुते आणि सचिव आद. श्रीमती संगीता विसपुते यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे आणि समयसुचकते मुळे आदर्श शैक्षणिक संकुल, हे कोणत्याही कठीण प्रसंगात ठामपणे उभे राहाते…. कोरोना सारख्या जागतिक संकटामध्ये सुध्दा , संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या विविध ५० शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून या उभयतांनी वेळोवेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत , आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ‘ Work From Home ‘ या संकल्पने नुसार , सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू ठेऊन, समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे…..
” आदर्श शिक्षक प्रशिक्षण केंद्र ” हे यापैकीच एक, संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक केंद्र संचालिका मार्फत समस्त जनतेला दिला गेलेला एक संदेश… एक जनजागृती….
” चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे संयम ठेवतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात , पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्र्वास ठेवतात “…
मित्रहो आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही.
सकारात्मक विचार करूया,
सहकार्य करूया ,
विजय मिळवूया,
कोरोनावर मात करूया.
प्राचार्या
श्रीमती जाई जगताप.
🙏🏻🙏🏻